![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
चांगले गृहसौख्य लाभेल. मित्रमंडळींचा गोतावळा जमेल. गप्पांमध्ये दिवस मजेत जाईल. व्यावहारिक ज्ञान वापरण्याची योग्य संधी मिळेल. कामाची उत्तम पकड जमेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
तुमच्या मताचा मान राखला जाईल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. शाब्दिक चकमक टाळा.प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम परीक्षण कराल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
कौटुंबिक खर्च वाढेल. आवक चांगली राहील.मौल्यवान वस्तू खरेदी कराल. अत्यंत लाघवी शब्द वापराल. आवडते पदार्थ चाखाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. मनाची चंचलता जाणवेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पित्तविकार जाणवतील.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
इतरांवर तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. झोपेची तक्रार जाणवू शकते. दिवस चैनीत घालवाल. कागदपत्रे जपून ठेवावीत.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कामाच्या बाबतीत समाधानी असाल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मित्रांची मदत होईल. नवीन वाहन खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
व्यावसायिक लाभ चांगला होईल. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. आर्थिक जम बसेल. कलेतून चांगला फायदा संभवतो. नवीन ओळखी होतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
तांत्रिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल. स्वकष्टावर भर द्यावा. कामातील दिरंगाई टाळावी. वरिष्ठांचीमर्जी राखावी. प्रवासात काळजी घ्यावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
चिकाटी सोडून चालणार नाही. मनावरची मरगळ झटकावी लागेल. हातातील कामावर अधिक भर द्यावा. अचानक धनलाभ होईल.गैरसमज टाळावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
जवळच्या व्यक्तीची मानसिकता जाणून घ्यावी. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. प्रेमसौख्यात पुढाकार घ्यावा. भागीदारीतील जम नीट बसवावा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात कराल. कोर्टकचेरीची कामे निघतील. कौटुंबिक सौख्यात रमाल. हातातील कामे पूर्ण होतील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
हट्टीपणा सोडवा लागेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रेमसंबंध सुधारतील. तुमच्या मताला विरोध केला जावू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.