प्रभाग १५ : सेक्टर २६ मधील प्रचारयात्रा की शक्तीप्रदर्शनाचा महाउत्सव ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी २०२६ | प्रभाग क्रमांक १५ मधील प्राधिकरण सेक्टर २६ गुरुवारी संध्याकाळ नेहमीपेक्षा वेगळ्याच रंगात दिसत होता. रस्ते तेच होते, घरे तीच होती; पण वातावरण मात्र पूर्ण बदललेले. भाजपची प्रचारयात्रा आली आणि परिसरात राजकारणाचा आवाज घुमू लागला. पुढे भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे आत्मविश्वासाने चालत होते. त्यांच्या सोबत भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुपजी मोरे, माझी महापौर आर. एस. कुमार साहेब यांची उपस्थिती ही केवळ औपचारिक नव्हती, तर “आम्ही मैदानात उतरलेलो आहोत” असा ठळक संदेश देणारी होती. ही यात्रा म्हणजे फक्त प्रचार नव्हता; ती एक जाहीर घोषणा होती—प्रभाग १५ मध्ये निवडणूक आता गंभीर टप्प्यात पोहोचली आहे.

या यात्रेमागे चालणारी माणसे पाहिली, की लक्षात येत होते की ही गर्दी अचानक जमलेली नाही. सलीम भाई शिकलगार, अतुल इनामदार, आनंद देशमुख, बोरलेकर काका, बापू काचोळे, केतन जावळकर, योगेश मदने, अजय कोल्हे, आशिष राऊत, सागर घोरपडे ही नावे कार्यकर्त्यांची असली, तरी त्यामागे सामाजिक ओळख होती. निसर्गदर्शन सोसायटीचे चेअरमन राऊत सर, अमर राठोड, केतन गांगुर्डे, चंद्रशेखर पवार, पाटील साहेब, जोशी काका, पवार साहेब यांनी यात्रेला अनुभवाची धार दिली. हे चेहरे म्हणजे मतदारांशी जोडलेले दुवे—जे निवडणुकीत भाषणांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात.

सोसायटीनिहाय सहभाग हे या यात्रेचे खरे वैशिष्ट्य होते. शुभम टॉवर येथील गुलाब बोराडे, सागर घावटे, राजेंद्र कानगुडे; शुभम पार्क येथील बोकील काकू, अपर्णा मिसळ, भुजबळ काकू, गायकवाड काका, पोखरकर काका; त्रिमूर्ती हाउसिंग सोसायटीतील प्रकाश माळी, मिलिंद ढोबळे, साजन कदम; पर्णकुटी ज्येष्ठ नागरिक संघातील प्रशांत काळे, सुरेश सोनवणे, भालेराव काका, मालुसरे काका, शरद कर्पे, दत्तात्रय माळी, महिपती चव्हाण, बाजीराव भालेराव, नंदलाल विसपुते, उदयसिंग शिंदे, भुजबळ साहेब, मोहन कोटी भास्कर, नंदकुमार पळशीकर; राजेंद्र राऊत, मुन्ना ठाकूर; ईडन गार्डन सोसायटीतील सचिन जंगले, सुनील पाटील, उदयसिंग शिंदे, खुशाल बारापत्रे—ही नावे म्हणजे भाजपने उभा केलेला सामाजिक नकाशाच होता.

यातच कदम काका, बाळासाहेब धुमाळ, आनंदा साळुंखे, कैलास झिरकांडे, विलास मोरे, रामचंद्र हट्टीकट्टी, अनिल जांभळे, विकास सोनवणे, सुधीर भातलवंडे, रतिलाल चौधरी, ढमाले काका, केरू राऊत, पेणकर काका, जगताप काका, चंद्रकांत चव्हाण, हिंदुराव मांढरे, प्रसाद गावडे, नाना घंगाळे, देविदास सांगडे, डुंबरे सर, नीलिमा कोल्हे, राधिका बोर्लेकर, सुषमा लाड, संध्या पालांडे, शांता भुटनवर, सुहास देशमुख, वासुदेव अवसारे आणि चंद्रकांत मोरे यांची उपस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट झाली—ही लढाई केवळ उमेदवारांची नाही, ती संपूर्ण प्रभागाची आहे. आता प्रश्न इतकाच उरतो: एवढी नावे मतपेटीत किती वजनदार ठरतात? त्याचे उत्तर मात्र निकालाच्या दिवशीच मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *