![]()
🔥 महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी -पिंपरी–चिंचवड : प्रभाग क्रमांक १५ मधील भारतीय जनता पार्टीच्या अमित गावडे , शैलजा मोरे, राजू मिसाळ, शर्मिला बाबर या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता म्हणजे जणू विजयाचा सार्वजनिक ऐलानच ठरावा, अशी भव्य रॅली शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे, घोषणांनी दुमदुमलेले रस्ते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही केवळ प्रचाराची सांगता नव्हे, तर विरोधकांसाठी स्पष्ट इशाराच होता. “माजी महापौर” म्हणून ओळखले जाणारे आर. एस. कुमार साहेब, भाजपयुमो अध्यक्ष अनुप मोरे, सलीम भाई शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीने आकुर्डी गावठाण, गंगानगर, निगडी गावठाण,प्राधिकरण मधील सर्व सेक्टर संपूर्ण प्रभाग पिंजून काढला.
या रॅलीला अतुल इनामदार, अरुण थोरात, सचिन कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, शिनकर काका, शाहीर प्रकाश ढवळे, अमोल भोईटे, सागर घोरपडे, प्रकाश ताकवणे, विलास शिंदे, संदीप मुदलीयार, भिमाशंकर कुरुर, शरद कर्पे, योगेश मदने, गायकवाड काका, योगेश जाधव, किरण यादव, महासिद्धा कोळी, बाळासाहेब धुमाळ, केरु राऊत, डुंबरे सर, जगताप काका, लाहोटी सर, रामचंद्र गावडे, नरवडे काका, सुमित शिंदे आदींची भक्कम उपस्थिती लाभली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, तर घोषणांमध्ये विजयाचा सूर स्पष्ट ऐकू येत होता. “प्रभागाचा विकास, भाजपाचाच अधिकार” हा संदेश रॅलीतून ठळकपणे देण्यात आला.
महिला शक्तीनेही या रॅलीला वेगळीच धार दिली. शकुंतला गावडे, अश्विनी लायगुडे, अपर्णा मिसाळ, तृषा गावडे, राधिका बाबर ताकवणे, नीलिमा फटांगरे, आशा कर्पे, संजीवनी लायगुडे, वैशाली जायगुडे, मरगळे काकू, नाईकवडे काकू, सायली गावडे, दिशा कदम, मीनल भालेराव, वसुधा गावडे, महाले काकू, मराठे काकू, नरवडे काकू यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. “घराघरात विकास पोहोचवायचा असेल तर भाजपलाच संधी द्या,” असा ठाम संदेश महिलांनी दिला.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ही रॅली म्हणजे भाजपची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचा वाढता विश्वास यांचे जिवंत प्रदर्शन ठरले. विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी ही सांगता रॅली प्रभाग १५ मध्ये भाजपच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. “ही रॅली पाहून एकच प्रश्न उरतो—निवडणूक कोण जिंकणार? उत्तर मात्र रस्त्यावरच लिहिले गेले आहे!”
