![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
दिवस आळसात घालवाल. घरात तुमचा दबदबा राहील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदारीत समाधानी असाल. उत्तम गृहसौख्य लाभेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
उगाच कोणाशीही शत्रुत्व घेवू नका. आरोग्यात सुधारणा होईल. स्त्रीवर्गाची मदत घ्याल.जवळचे नातेवाईक भेटतील. कामाचा उरक वाढेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
करमणुकीच्या कार्यक्रमाला जाल. दिवस हसत-खेळत घालवाल. वाढत्या खर्चावर आवर घालावी लागेल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. चांगला धनलाभ होईल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मनाची चंचलता बाजूला सारावी. मित्रांचा राग ओढवून घेवू नका. किरकोळ दुखण्यांकडे लक्ष द्यावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. आवडीच्या वस्तू खरेदी कराल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
आरोग्याची काळजी घ्यावी. स्त्रीवर्गाशी वाद वाढवू नयेत. झोपेची तक्रार जाणवेल. जवळचा प्रवास मजेत होईल. काटकसर करावी.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
नवीन ओळखीचा फायदा होईल. घरात मोठ्या लोकांचा वावर होईल. चांगला आर्थिक लाभ संभवतो. चोखंदळपणे वागाल. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडेल
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यावसायिक लाभाने खुश असाल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. महत्त्वकांक्षेने कामे कराल. चुकीच्या गोष्टीत अडकू नका.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
मानसिक स्थैर्य जपावे. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. यात्रेची संधी चालून येईल. वडिलधाऱ्यांचा मान ठेवावा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
गैरसमजाला दूर सारावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. संयम राखावा लागेल. काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. कामात स्त्रीवर्गाची मदत घ्याल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
जोडीदाराच्या प्रगतीने खुश व्हाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. तुमचा लोकसंग्रह वाढेल. गैरसमज टाळावेत.कामानिमित्त दूर गावी जावे लागेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
विरोधकांवर मात करू शकाल. हातातील कामात यश येईल. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. चेष्टा-मस्करी करणे टाळावे.हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
मुलांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. विचार भडकपणे मांडू नयेत. तारतम्यता बाळगावी. कलेला चालना मिळेल.