![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २९ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
प्रेमसंबंध सुधारतील. करमणुकीवर भर द्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. घरातील कामाची दगदग जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
सर्व बाबी चांगल्याप्रकारे जाणून घ्याल. चर्चेत आवडीने भाग घ्याल. तांत्रिक कामात प्रगती कराल. भावंडांना कामात मदत कराल. सामाजिक जाणीवेतून कामे कराल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मध्यस्थीचे काम कराल. व्यावहारीक बुद्धिमत्ता वापरावी. बोलताना भान विसरू नये. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
तत्परतेने कामे कराल. फार चिकित्सा करू नका. भावनिक विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. सुसंगत शब्दांची जोड घ्यावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
आपला रुबाब दाखवाल. धीटपणे वागाल. मागचापुढचा विचार करावा लागेल. खर्चाचे भान राखावे. दृढनिश्चय करावा.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
वादात अडकू नये. काही गोष्टी योग्यवेळीच बोलाव्यात. क्षणिक गोष्टींचा लाभ घ्याल. गैरसमजुतीमुळे मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
चांगला आर्थिक लाभ होईल. तुमचा मान वाढेल. सामाजिक कामात रस घ्याल. मौल्यावान वस्तू खरेदी कराल. कष्टावर अधिक भर द्याल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )
सामाजिक दर्जा उंचावेल. सत्तेचा अधिकार गाजवाल. महत्त्वकांक्षा वाढीस लागेल. विरोधकांकडे लक्ष द्यावे. निषेध दर्शविताना विचार करावा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
इतरांपुढे आदर्श ठेवाल. स्वभावात मानीपणा आणू नये. सतत खटपट कराल. प्रवासात काळजी घ्यावी. मानापमानाच्या प्रसंगात अडकू नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. तब्येतीची हयगय करू नका. हातातील कामात चिकाटी धरून ठेवावी लागेल. पोटाचे विकार जाणवू शकतात.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
ठाम निश्चय कराल. उच्च राहणीची आवड दर्शवाल. जोडीदाराला लाभ होईल. क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष करावे. भागादारीतील मतभेद दूर करावेत.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
कामाचा उरक वाढेल. हातात काही अधिकार येतील. कार्यपद्धतीत बदल कराल. मुलांना कामात मदत कराल. सकारात्मक विचार करावेत.