![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २८ जानेवारी | सकाळचे पावणे नऊ वाजले होते.. अजितदादांचं विमान अगदी पाच मिनिटांत लँड होणार होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं… परिस्थिती लँडिंग घेण्यासरखी नव्हती, त्यामुळे ते विमान घिरट्या घेत होतं. शेवटी विमानतळाच्या जवळच शेतात ते कोसळलं अन् स्फोट झाला. कामाचा माणूस अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे अजितदादा मरण पावले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव तर फारच भीषण आणि थरारक आहेत.
बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी धाऊन गेलेल्या एका महिलेने सांगितलं की, विमानाने एक घिरटी मारली आणि दुसऱ्यांदा ते घिरटी मारत होतं.. ते खूपच खालून गेलं आणि कोसळलं आणि स्फोट झाला.. आम्ही फोन केल्यानंतर विमानतळाचे पोलिस आणि कर्मचारी धाऊन आले.. परंतु स्फोट एवढा होता की कोणी काहीच करु शकत नव्हतं. त्यानंतर अग्मिशमन दल दाखल झालं.
दुसऱ्या एका महिलेने अनुभव सांगितला, आम्ही बादलीने पाणी आणत होतो. साईडला एक बॉडी उडून पडली होती.. शीर नव्हतं फुगलेली बॉडी होती. आम्ही ब्लँकेट दिलं आणि पोलिसांनी बॉडी गुंडाळून घेतली.
तिसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान कोसळलं आणि लगेच दोन बॉडी बाहेर फेकल्या गेल्या.. चेहरा काहीच दिसत नव्हता. गॉगल आणि वॉचवरुन हे दादाच आहेत, हे आम्ही ओळखलं. आम्ही पहिल्यांदा दादांची बॉडी काढली. हे विमान विमानतळावर केवळ पाच मिनिटांत उतरले असते, पण दुर्दैवी मृत्यू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
”असं नेतृत्व घडायला मोठा काळ जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात आहे. सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे देशामध्ये हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करुन ठरवण्यात येतील. सुप्रियाताई आणि पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं आहे. संपूर्ण परिवार बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलेला आहे.” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
