![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मार्च २०२६ ।। राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसीबाबत पसरलेल्या अफवांवर अखेर पडदा पडला असून, महिलांकडे अजूनही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ शिल्लक आहे. सोशल मीडियावर “मुदत संपली” अशा चर्चा रंगत असतानाच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की, घाबरण्याचं अजिबात कारण नाही.
These reports being circulated are incorrect and not based on any official data.
The eKYC process is ongoing and will continue until 31st March. The department has not released any official figures or findings so far.
I urge media organisations to verify facts with the…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 11, 2026
याबाबत महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी स्वतः पुढे येत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, लाभार्थ्यांची कपात होणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत महिलांना ती पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महत्त्वाचं म्हणजे, ज्या महिलांच्या ई-केवायसीमध्ये काही चुका झाल्या आहेत, त्यांच्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी आहे. ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती करून पुन्हा योग्य माहिती अपडेट करता येणार आहे. त्यामुळे लाभ मिळण्यात अडथळे येणार नाहीत. ही संधी गमावली तर पुढे लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, अजून वेळ आहे पण तो फार कमी आहे! त्यामुळे लाभार्थी महिलांनी विलंब न करता तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. अफवांपासून दूर राहून अधिकृत माहितीलाच महत्त्व दिलं, तरच या योजनेचा फायदा अखेरपर्यंत मिळू शकणार आहे.
