![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मार्च २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था वधू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.
कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्यांचा सल्ला घ्यावा.
सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.
तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड यू शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.
मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.