![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च २०२६ ।। जागतिक इंधन बाजारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. Russiaने १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोल निर्यातीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जुलै अखेरपर्यंत लागू राहणार असून, देशांतर्गत इंधन पुरवठा स्थिर ठेवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रशिया दररोज मोठ्या प्रमाणात पेट्रोल निर्यात करतो, त्यामुळे या निर्णयाचे पडसाद जागतिक बाजारात उमटणार हे निश्चित मानले जात आहे. विशेषतः China, Turkey, Brazil आणि Singapore यांसारख्या देशांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
मात्र भारतासाठी या निर्णयात काहीसा दिलासा दडलेला आहे. भारत प्रामुख्याने रशियाकडून तयार पेट्रोल न घेता कच्चे तेल (Crude Oil) आयात करतो आणि देशातील रिफायनरींमध्ये त्याचे पेट्रोल-डिझेलमध्ये रूपांतर करतो. त्यामुळे रशियाने पेट्रोल निर्यात बंद केली तरी भारताच्या दैनंदिन इंधन पुरवठ्यावर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. उलट, भारताकडे मजबूत रिफायनरी नेटवर्क असल्यामुळे पुरवठा साखळी सध्या स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांसाठी तातडीने दरवाढ होईल, अशी भीती सध्या तरी कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तथापि, जागतिक बाजारातील अस्थिरता ही भारतासाठी दीर्घकालीन चिंतेची बाब ठरू शकते. रशियाचा हा निर्णय, मध्यपूर्वेतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव निर्माण होऊ शकतो. परिणामी, ब्रेंट क्रूडच्या दरात वाढ झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे सध्या जरी परिस्थिती नियंत्रणात वाटत असली, तरी पुढील काही महिन्यांत जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
