![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ एप्रिल २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.
कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.
सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.
कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. आधिभौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.
तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसाय वृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो.
मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यानधारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.