Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! दिल्लीत हालचाली वेगात; ‘फोटोवर फुली’ने वाढवला संशयाचा धूर

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ एप्रिल २०२६ ।। नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणाने आता धोकादायक वळण घेतले असून, तपास यंत्रणांच्या हालचालींना अचानक वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आता दिल्लीतही मोठ्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, खरातकडून दोन-तीन नेत्यांच्या फोटोवर ‘फुली’ (X) मारण्यात आल्याचा तपशील समोर आला आहे. मात्र, Ajit Pawar यांच्या फोटोवर अशी कोणतीही खूण नसल्याचे सांगितले जात आहे. या गूढ हालचालीमुळे प्रकरणाचा व्याप्ती आणखी वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

चौकशीदरम्यान Ashok Kharat मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे. “मी इथून बाहेर पडणार नाही, माझं मरण इथेच आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्याने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वतःला दैवी अवतार म्हणवत महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप आधीच त्याच्यावर आहेत. आतापर्यंत तब्बल १५ गुन्हे दाखल असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, फसवणुकीचा गुन्हा त्याने कबूल केल्याचीही माहिती मिळत आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात शिक्षा टाळणे आता कठीण मानले जात आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारांवरही मोठा फोकस ठेवण्यात आला आहे. Enforcement Directorate कडून खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या तीन बँक खात्यांवर सील ठोकण्यात आले आहे. बनावट अधिकाऱ्यांचा धाक दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप समोर आला आहे. Income Tax Department च्या नावाने भीती निर्माण करून फसवणूक केल्याची शक्यता तपासली जात आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, कोट्यवधी रुपयांच्या उलाढालींची पडताळणी होत आहे. या सर्व घडामोडींमुळे आता Ashok Kharat यांच्यावर आयुष्यभर कारावासाची टांगती तलवार अधिकच तीव्र झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *