सविनय कायदेभंग केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २० सप्टेंबर -:लोकल सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करू असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पस्ट केलं होतं. याबाबत सोमवारी म्हणजे उद्या आंदोलन करू असा इशाराही संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर सेंट्रल रेल्वे पोलिसांनी आणि दादर पोलिसांनी संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोरोनाच्या संवेदनशील काळात नियम मोडून संदीप देशपांडे यांनी रेल्वे प्रवास करू नये असं पोलिसांनी संदीप देशपांडे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हंटलं आहे. मात्र, रेल्वे आणि दादर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे रेल्वेने प्रवास करणार असल्याचं समजतंय.

मुंबईमध्ये उपनगरमधून येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतोय. कल्याण डोंबिवली किंवा त्याहीपुढून देखील मुंबईत दररोज हजारो चाकरमानी कामानिमित्त दररोज येत असतात. मात्र लोकल बंद असल्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक त्रासाचा सामना करावा लागतोय. आर्थिक त्रासासोबत ट्रेन बंद असल्याने रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफिकमध्ये या नागरिकांना तासंतास अडकून राहावं लागत. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक दोन्ही त्रासाचं मुंबईत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अशी संदीप देशपांडे यांनी भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर उद्या संदीप देशपांडे सविनय कायदेभंग करणार आहेत. उद्या ते ट्रेनमध्ये प्रवेश करून आपलं आंदोलन करणार आहेत.

मात्र सेंट्रल रेल्वे पोलिस आणि दादर पोलिसांनी संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवली आहे. संदीप देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांनी असा कोणताही प्रयत्न केला तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असं या नोटिशीमध्ये स्पष्ट नमूद केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *