महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – दि. २१ सप्टेंबर – दिनांक 1 सप्टेंबर पासून केंद्र सरकारने…. महाराष्ट्र राज्याला कोरोना महामारी वर उपचारासाठी साठी लागणारे साहित्य पुरवणे बंद केले आहे. ज्यात व्हेंटीलेटर , पि.पी.ई. किट, टेस्टिंग किट ,एन 95 मास्क इ. साधनांचा समावेश होता. केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेवर उघड उघड अन्याय करत आहे असा
आरोप करून महाराष्ट्रातील जनता देशवाशी नाही का? असा सवाल खासदार डाॅ. अमोलजी कोल्हे यांनी संसदेत उपस्थित करून सदर साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करावा अशी मागणी केंद्र सरकार कडे केली आहे…..तसेच कोरोना महामारी नियंत्रणात येण्यासाठी व्हेंटीलेटर चे उत्पादन करणारा कारखाना महाराष्ट्रात सुरू करावा अशीही मागणी केंद्र सरकार कडे डाॅ.अमोलजी कोल्हेंनी केली.