Horoscope Today दि. २९ एप्रिल २०२६ ; आज योग्य संधीची वाट पाहावी.. ……… ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
मनाची चंचलता जाणवेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल. कामातील द्विधावस्था टाळावी. काही बदलांना सामोरे जावे लागेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे टाळा. चटकन निराश होवू नका. अनाठायी खर्च टाळावा.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. घरातील वातावरण खेळकर राहील. काही गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवाल. चित्त एकाग्र करावे.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पाहावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. पारमार्थिक कामात मदत कराल.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
मानसिक ताणतणाव राहील. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. नैराश्याला बळी पडू नका. तडजोडीला पर्याय नाही.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्ग खुश राहील. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल. चार चौघांत कौतुकास पात्र व्हाल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वादविवाद सामोपचाराने सोडवावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
अडथळ्यातून मार्ग काढता येईल. आपलेच म्हणणे खरे कराल. उष्णतेचे विकार संभवतात. शांततेचे धोरण स्वीकारावे. मेहनतीवर भर द्याल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
अती विचार करणे टाळावे. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचा सल्ला घ्याल. तर्कसंगत विचार करावा.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
आपले मत ठामपणे मांडाल. कामात प्रगतीला वाव आहे. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *