![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मे २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सतत खटपट करत राहाल. कामाचा ताण जाणवेल. चिकाटी सोडू नका.
वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
सर्वांशी गोड बोलणे ठेवाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. बर्याच दिवसांची हौस पूर्ण करून घ्याल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. प्रेमाच्या दृष्टीने उत्तम मैत्री लाभेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
मनातील विचित्र कल्पना काढून टाका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रेम प्रकरणाला बहार येईल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. घरगुती कामे आनंदाने पार पाडाल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणा दिसून येईल.
सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
जवळच्या प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. बर्याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
कौटुंबिक वातावरणात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यात भर द्याल. चारचौघांत आपली कला सादर करा. योग्य संधीची वाट पहावी लागेल. कामातील अडथळे दूर होतील.
तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. नातेवाईकांचे प्रश्न जाणून घ्याल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
क्षुल्लक वादावादीत अडकू नका. काटकसरीवर भर द्यावा. प्रवासात योग्य सावधानता बाळगावी. हातात नवीन अधिकार येतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
काही कामे अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. कामाच्या ठिकाणी चंचलता टाळावी. नातेवाईकांशी सामोपचाराचे धोरण ठेवावे. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल. नसती काळजी करत बसू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
पित्त विकार बळावू शकतो. इतरांना सहृदयतेने मदत करू शकाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरगुती कामात वेळ घालवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope )
सामाजिक जाणीवेपोटी काम कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.