Horoscope Today दि. ८ मे २०२६ ; आज चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.……… ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ मे २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी वाद वाढवू नयेत.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक लाभ संभवतो.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscopei)
मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. कामात कसलीही कसूर करू नका. वातविकाराचा त्रास जाणवू शकतो.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
स्त्रियांशी मैत्री कराल. खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेला योग्य दाद मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुशलपणे आपले मत पट‍वून द्याल. उगाच शिस्तीचा बडगा आमलात आणू नये. प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास संभवतो.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
भावंडांची काळजी लागून राहील. भागीदारीत अधिकाराने वागाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
घरगुती प्रश्न चिघळू देवू नयेत. चांगला व्यावसायिक लाभ होईल. काहीसा मानसिक ताण जाणवेल. जोडीदाराचे बोलणे लाडिक वाटेल. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
दिवस सत्कारणी लावाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल. प्रवास जपून करावा.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
तुमच्या बोलण्याला धार येईल. मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुमच्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग होईल. आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार करावा.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
रागावर नियंत्रण ठेवा. अती महत्त्वाकांक्षा चांगली नाही. तुमच्यातील धाडस वाढीस लागेल. उत्साहाने कामे पूर्ण कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो. कामातील चलबिचलता टाळावी. व्यावसायिक बाबींचा सखोल विचार करावा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *