![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
नसते साहस करायला जाऊ नका. दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.
वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.
मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.
सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.
तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.
मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.