महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – २५ सप्टेंबर -नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी एका महिलेची वर्णी लागली आहे. सीईओ म्हणून सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे आदेश निर्गमित झाले आहेत.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार अशोक काकडे यांची बदली दि.17 मार्च रोजी निघाले होते.तेव्हापासून पद रिक्त होते.मधल्या काळात अनेक नावांची चर्चा होती.यात सर्वात नाव आघाडी होते, ते वर्षा ठाकूर व शिवानंद टाकसाळे यांचे होय.
यासंबंधीने राज्य सरकारने गुरुवार दि.24 रोजी नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांचे आदेश निघाले आहेत.नांदेड जिल्हा परिषदेत प्रथम महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महिला सनदी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर येणार आहेत.विशेष म्हणजे,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंगरानी अंबुलगेकर महिला,जिल्हा परिषद उपाध्यक्षपद्मा संतपलवार महिला आता सीईओ म्हणून ही महिलाच आल्या आहेत.त्यामुळे महिला राज कारभार प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे.