निवडणूकीचा निकाल काही येऊ द्या सहज सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वॉशिंग्टन – २५ सप्टेंबर -अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत पराभव झाल्यास, शांततेत सत्ता हस्तांतरण करणार नसल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत ट्रम्प निवडणुकीच्या निकालाबाबत म्हणाले की, पुढे काय होते हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल.

ट्रम्प म्हणाले की, यंदा निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. कारण त्यांना पोस्टल वोटिंगवर संशय आहे. सध्या अमेरिकेत अनेक राज्य कोरोना व्हायरसपासून लोकांची सुरक्षा व्हावी यासाठी मेलद्वारे वोटिंग करण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी प्रश्न विचारण्यात आला की, प्रतिस्पर्धी जो बाइडन यांच्याकडून पराभव झाल्यास, सत्तेचे शांततेत हस्तांतरण करणार का ? यावर ट्रम्प म्हणाले की, मी बॅलेटबाबत वारंवार तक्रार करत आलेलो आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी केवळ 41 दिवस बाकी असून, राष्ट्रीय ओपिनियन पोलमध्ये ट्रम्प हे डेमोक्रेटिक पक्षाचे जो बाइडन यांच्या मागे आहेत. कोरोना व्हायरस महामारी आणि बेरोजगारीवरून ट्रम्प यांचे विरोधक सातत्याने टीका करत आहेत.

2016 साली देखील ट्रम्प हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात निवडणुकीचे परिणाम मानन्यास तयार नव्हते. मात्र नंतर ट्रम्प विजयी तर झाले, परंतू पॉप्युलर वोटिंगमध्ये 30 लाख अंतरांनी त्यांचा पराभव झाला होता. या निकालाबाबत ट्रम्प आजही संशय व्यक्त करतात. ट्रम्प यांच्या सहज सत्ता सोडणार नाही, या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या पक्षाचे सिनेटर मिट रोमने यांनी ट्विट केले की, लोकशाहीचा मूलभूत मंत्र हे शांततेत सत्ता हस्तांतरण आहे, त्याशिवाय आपला देश बेलारूसप्रमाणे होईल. घटनेत दिलेल्या हमीचे पालन करण्यास ट्रम्पची इच्छा नसणे हे अकल्पनीय आणि अस्विकार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *