महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – शारजा – २४ सप्टेंबर -सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला. २०१४ मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावाचा समाना करावा लागल्यानंतर अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं.
रोहित शर्माची तडाखेबाज ८० धावांच्या खेळी आणि भेदक गोलंदाजीमुळे मुंबईसमोर कोलकात्याचा निभाव लागला नाही. या सामन्यात सुरुवातील फलंदाजी करताना रोहितचे वर्चस्व दिसून आलं तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह चमकला. मात्र सामन्याच्या १८ व्या षटकामध्ये बुमराहची लय बिघडली आणि तळाला फलंदाजीसाठी आलेल्या कोलकात्याच्या पॅट कमिन्सने या एकाच षटकात २७ धावा ठोकल्या.