Horoscope Today दि. ३ जुलै २०२६ ; आज हातातील कामात यश येईल ….………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुलै २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope )
भावनिक गोंधळ वाढवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आज कामात फार मोठे बादल करू नका. उद्दीष्ट ठरवून ठेवा.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
कामातील दिरंगाई टाळावी. काही कामे चातुर्याने करावी लागतील. अति तत्परता दाखवू नका. वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. हटवादीपणा करून चालणार नाही.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope )
प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. मनातील इच्छेसाठी आग्रही राहाल. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. थोडीफार कसरत करावी लागू शकते. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
कामात चातुर्य दाखवावे लागेल. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. छानछोकीवर खर्च करावा लागेल. दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
मनोबल वाढवावे लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. हेकटपणे वागून चालणार नाही. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील. मनाची द्विधावस्था दूर ठेवा.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
सरळ मार्गी जमेल तेवढे करावे. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल. नव्या उर्जेने कामे कराल. प्रेमप्रकरणाला उभारी मिळेल.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
संमिश्रतेचा ताण कमी होईल. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
तुमची कार्य प्रवीणता वाढेल. जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवा. श्रम व दगदग वाढेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *