![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
स्वत:ला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे. मनातील चुकीचे विचार काढून टाका. कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल. प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. नसत्या शंका मनात आणू नका. व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी. वैचारिक गोंधळ घालू नका. हसत-हसत आपले मत मांडावे.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
चोरांपासून सावध राहावे. मित्रांशी पैज लावाल. आपला संयम ढळू देऊ नका. बचत करण्यावर अधिक भर द्यावा. कौटुंबिक गरजा ध्यानात घ्या.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
चर्चेला अधिक वाव द्यावा. तरुण मित्रांच्यात वावराल. नवीन ओळखी होतील. अनुभवी लोकांचा सल्ला विचारात घ्यावा. व्यापारातून चांगला लाभ संभवतो.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
शारीरिक क्षमता तपासून पहावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. जवळचा प्रवास करावा लागेल. कमिशन मधून चांगला लाभ कमवाल. कुटुंबाला पर्याप्त वेळ द्यावा.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
घरातील गोष्टींमध्ये अडकून पडाल. काही गोष्टींबाबत आग्रही राहाल. दीर्घकालीन फायद्याचा विचार कराल. नातेवाईकांवर आपली मते लादू नका. मित्रमंडळींशी जुळवून घ्यावे.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
सकारात्मक धोरण ठेवावे. कौटुंबिक खर्चाचा अधिक विचार कराल. इतरांना दुखवू नका. ताळमेळ साधत कामे करावी लागतील. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
मानसिक स्थैर्य जपावे. आलेल्या अनुभवातून काहीतरी शिकण्यास मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे मत मान्य करावे लागेल. जुन्या कामातून यश मिळेल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
जुन्या विचारात अडकून पडू नका. मनातील निराशा झटकून टाका. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील बदलात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
ध्यानधारणा व योगाचा तुम्हाला फायदा होईल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बोलण्यातून इतरांना दुखवू नका. घरात टापटीप ठेवाल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
उगाचच लहान सहान गोष्टींवरून चिडू नका. कलात्मक काम तुम्हाला आनंद देईल. नव्या संकल्पना फलद्रुप होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आवडत्या छंदाला वेळ काढाल.