कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांचा महत्त्वाचा सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – २५ सप्टेंबर – सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या कपल चॅलेंजवरून पुणे पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. बऱ्याच जणांना आपल्या खासगी आयुष्यातील फोटो शेअर करण्याची भलतीच हौस हसते. हेच साधून सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करतात. याआधीही सोशल मीडियावर मुलींचे फोटो इतर ठिकाणी वापरण्याचे प्रकार समोर आले होते.फेसबुकवर सध्या या ना त्या चॅलेंजला जोर आला आहे. त्यातच कपल चॅलेंज या हॅशटॅगने लोकांना भुरळ घातली आहे. लोकं आपल्या पत्नीसह फोटो अपलोड करत आहे. पण, पुणे पोलिसांनी कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.’कपल चॅलेंजवाल्याला सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल होईल’, असा इशारा पुणे पोलिसांनी तमाम चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना दिला आहे.

सायबर गुन्हेगार हे तुमचे फोटो हे फोटोशॉपमध्ये एडिट करून हव्या त्या ठिकाणी वापरू शकता. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला फेक अकाउंटशी सामना करावा लागतो. एवढंच नाहीतर तुमच्या फोटोचा कुठेही कसाही वापर होऊ शकतो. फेक अकाउंट असेल किंवा पोर्न साइटसवर सुद्धा हे फोटो वापरण्यात आलेले आहे. असे अनेक गुन्हे याआधीही घडले आहे.

जगभर Facebook आणि WhatsApp या दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑनलाइन चॅटिंग करण्यासाठी ही दोन माध्यमं प्रचंड लोकप्रिय आहेत. जगभरात करोडो युजर्स असलेल्या या दोन्ही माध्यमांच्या सुरक्षेसंदर्भात अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. WhatsApp आणि Facebook दोन्हीही फेसबुक कंपनीच्या मालकीचे आहेत. सुरक्षेसंदर्भात पुन्हा एक नवीन मुद्दासमोर आला असून आता WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं समोर आले आहे. यामुळे भविष्यात तुमचं WhatsApp देखील सुरक्षित राहणार नाही की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.काही अ‍ॅप्सचा वापर करून WhatsApp च्या मदतीने तुमच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले जाऊ शकते, असे Business Insiderच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे WhatsApp ची सुरक्षा म्हणजे Encryption तोडावं लागत नाही. अगदी सहज या अपच्या मदतीने तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवता येतं.

युजरची माहिती चोरणारी अ‍ॅप युजरवर लक्ष ठेऊन असतात. ज्यावेळी युजर ऑनलाईन येतो, तेंव्हापासून पासून त्याच्यावर लक्ष ठेवले जाते. ती व्यक्ती कुणाशी किती वेळ बोलते, कधी अ‍ॅप बंद करते, ऑनलाइन येण्याच्या त्या व्यक्तीच्या सवयी काय आहेत ही सगळी माहिती या अ‍ॅप्सना मिळू शकते. अनेक दिवसांचा आणि आठवड्यांचा डेटा एकत्रित करून या युजरच्या ऑनलाइन सवयींचं आणि वागणुकीचं प्रोफाइल तयार केलं जातं. Electronic Frontier Foundarion (EFF) मधील वरिष्ठ संशोधकांनी असं म्हटलंय की गूगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर दोन्हीवर अशा पद्धतीची बरीच अप उपलब्ध आहेत.

ही Stalkerware सारखी अ‍ॅप ही माहिती त्यांच्या ग्राहकांना विकतात. सर्व युजरचा डेटा एकत्रित करून ते सर्व डेटा एकमेकांशी मॅच करून पाहतात. त्यानंतर त्यांच्या अ‍ॅपमध्ये ज्या व्यक्तीचा डेटा पहायचा आहे त्याचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या अ‍ॅपच्या मदतीने आपोआप त्याच्या ऑनलाइन हालचाली ट्रॅक होऊ शकतात. ही माहिती पुरवणाऱ्या अ‍ॅपचे ग्राहक या माहितीचा वापर संभाव्य ग्राहकाच्या ऑनलाइन सवयींवरून त्याला काय आणि कधी विकायचं हे ठरवण्यासाठी करतात. काही पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करत असल्याचं देखील समोर आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *