महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – २५ सप्टेंबर – राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. महिन्यापुर्वीच त्यांचे थोरले बंधू आणि अंध विद्यार्थ्यांचा आश्रम चालविणारे आप्पा गायकवाड यांचे निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वी प्रदीप गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यातून ते बाहेर आले होते. पण आज सकाळी अचानक रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
राष्ट्रवादीचे शहरातील एक अत्यंत कार्यक्षम, धाडसी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. पक्षातील विविध उपक्रम राबविण्याची तसेच संघटनात्मक बांधनीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. लोखंडी फर्निचर बनिविण्याचा त्यांचा स्वतःचा उद्योग होता.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघटनेचे शहर अध्यक्ष “प्रदीप गायकवाड” यांचे मुळे निधन ….. लाॅकडावून च्या कालावधीतील विज बिल माफ करण्या साठी त्यांनी आवाज उठवून सरकार कडे पाठपुरावा ही केला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजात ते उत्साहा ने भाग घेत असत. लघुउदयोग अडचणीतुन बाहेर पडावेत अशी सतत त्यांची तळमळ असे. अशी भावना जेष्ठ कर सल्लगार पी.के महाजन यांनी व्यक्त केली.