महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – २५ सप्टेंबर – कोरोनाच्या संकटकाळात फ्रॉडच्या घटना वाढल्या आहेत. आरबीआयकडून वारंवार फ्रॉडपासून वाचण्याचा सूचना ग्राहकांना देण्यात येत आहेत. तरी देखील ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरी झाल्यास तुम्ही काय केले पाहिजे याची माहिती आरबीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.आरबीआयने खातेधारकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी 6 जुलै 2017 रोजी एक सर्क्यूलर जारी केले होते. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार खात्यातून अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाल्यास ग्राहकांनी काय करावे
या सर्क्यूलरच्या मते, असे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाल्यास बँकेला तीन दिवसांच्या आतमध्ये याबाबत सूचित करा. बँकेला माहिती देणे अनिवार्य आहे. जर तुमच्या चुकीमुळे हे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले नसल्यास बँक तुम्हाला पूर्ण नुकसान भरपाई देईल
जर आपण 3 दिवसानंतर माहिती दिली तर काय होईल? – जर आपल्या खात्यात अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाली असेल आणि तुम्ही बँकेला 4 ते 7 दिवसांच्या दरम्यान माहिती दिली तर या प्रकरणात आपल्याकडे मर्यादित दायित्व असेल. म्हणजेच, अनधिकृत व्यवहाराच्या नुकसानाचा काही भाग तुम्हाला सहन करावा लागतो.
किती पैसे परत मिळतील?- जर तुमचे बँक खाते बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉझिट खाते अर्थात झिरो बॅलेन्स खाते आहे तर तुमची लायबिलिटी 5000 रुपये असेल. म्हणजे जर तुमच्या खात्यातून 10000 रुपयांचे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला 5000 रुपयेच परत मिळतील. उर्वरित 5000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल
बचत खात्यासाठी काय नियम आहे? – जर तुमचे बँक खाते सेव्हिंग खाते आहे तर तुमची लायबिलिटी 10000 रुपये असेल. म्हणजे जर तुमच्या खात्यातून 20000 रुपयांचे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला 10000 रुपयेच परत मिळतील. उर्वरित 10000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल
करंट अकाऊंट आणि क्रेडिट कार्डसंदर्भात काय नियम आहे? – जर तुमचे करंट अकाऊंट किंवा 5 लाखाची मर्यादा असणाऱ्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाल्यास, अशावेळी तुमची लायबिलिटी 25,000 रुपये असेल. म्हणजे जर तुमच्या खात्यातून 50000 रुपयांचे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला 25000 रुपयेच परत मिळतील. उर्वरित 10000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल
7 दिवसानंतर बँकेला माहिती दिली तर काय होईल? जर आपण अनधिकृत व्यवहाराची माहिती बँकेला 7 दिवसानंतर दिली असेल तर बँकेच्या मंडळावर की ते तुमची लायबिलिटी कशी ठरवतात. अशा परिस्थितीत बँक तुमची लायबिलिटी माफ देखील करू शकते.