![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
आपल्या हिंमतीने सर्वांची दाद मिळवाल. मनातील इच्छा पूर्णत्वास येईल. सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल. जिद्दीने कामे तडीस न्याल. कौटुंबिक वातावरण हलके फुलके ठेवाल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल. सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे. जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक कराल. कुटुंबात वैचारिक देवाणघेवाण होईल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. नियम मोडून चालणार नाहीत. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
अचानक धनलाभाची शक्यता. कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. नवीन नियम पाळताना कसरत करावी लागेल. सहकार्यांना मदतीचा हात पुढे कराल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
घरातील मोठ्यांचा आधार मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. ओळखीतून रखडलेली कामे मार्गी लागतील. सहकार्यांच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कामात चंचलता आड येऊ शकते. वेळेचे योग्य पालन करावे. नियोजनबद्ध कामे आखावीत. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
करमणुकीतून नवीन गोष्टी शिकाल. आशावादी दृष्टीने कामाकडे पहावे. घरात तुमचे प्रभुत्व राहील. कलेची आवड जोपासाल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
आर्थिक गरज भागेल. गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी. जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल. जवळचा प्रवास चांगला होईल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
साधक बाधक विचार करावा लागेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. हित शत्रूंवर जय मिळवाल. व्यवसायातील विरोधी हालचाली लक्षात घ्या. विवेक बुद्धीचा योग्य वापर करावा.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
तुमच्यातील धाडस वाढेल. योग्य व नियोजन पूर्व कामे आखावीत. दूरदृष्टी ठेवून वागावे. चोख कामे करण्याकडे कल राहील. कौटुंबिक बाबतीत निराशा झटकून टाका.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
योग्य व्यावहारिक ज्ञान वापरावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. फटकळपणे बोलणे टाळावे. अति स्पष्टता बरी नव्हे.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
कामाला अधिक उत्साह येईल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. व्यावसायिक चिंता दूर कराव्यात. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. वाढत्या व्यापामुळे व्यस्त राहाल.