IPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील सूर सुपरस्टार !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २८ सप्टेंबर – शारजा – इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला धडाक्यात प्रारंभ झाला असून, पहिल्याच आठवडय़ात चाहत्यांना ‘सुपर ओव्हर’चा थरार आणि शतकी नजराणा पाहायला मिळाला. मात्र त्याचबरोबर २१ वर्षे अथवा त्याखालील वयाचे काही खेळाडूही ‘आयपीएल’ गाजवताना दिसत आहेत. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अशा एकूण २५ देशी-विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

‘आयपीएल’मध्ये सहभागी झालेल्या भारतीय युवा खेळाडूंवर नजर टाकल्यास तीन-चार नावे लगेच डोळ्यांसमोर येतात ती म्हणजे दिल्लीकडून खेळणारा मुंबईकर पृथ्वी शॉ, बेंगळूरुचा देवदत्त पडिक्कल, कोलकाताचा शुभमन गिल आणि पंजाबचा रवी बिश्नोई. या चौघांनीही आपापल्या संघांच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. राजस्थानचे यशस्वी जैस्वाल, रियान पराग, हैदराबादचे प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा आणि बेंगळूरुचा वॉशिंग्टन सुंदर यांना अद्याप छाप पाडता आलेली नसली तरी येणाऱ्या लढतीत तेसुद्धा नक्कीच चमकतील, अशी अपेक्षा आहे. फिरकीपटू राहुल चहर आणि वेगवान गोलंदाज शिवम मावी यांनी अनुक्रमे मुंबई आणि कोलकातासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

मात्र याशिवाय काही असेही युवा भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना या हंगामात अद्याप तरी संधी मिळालेली नाही, परंतु त्यांच्यातही गुणवत्ता ठासून भरली आहे. मुंबईतील अनुकूल रॉय, प्रिन्स बलवंत राय सिंग, हैदराबादचा अब्दुल समद, राजस्थानचे कार्तिक त्यागी, मणिपाल लोमरोर, आकाश सिंग, अनुज रावत, पंजाबचे अर्शदीप सिंग, दर्शन नळकांडे, प्रभसिमरन सिंग आणि कोलकाताचा कमलेश नागरकोटी यांसारखे खेळाडू यंदा ‘आयपीएल‘च्या क्षितिजावर चमकण्यासाठी सज्ज आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *