१ ऑक्टोबरपासून तुमच्या आयुष्यात होणार हे नवे बदल ; गॅस सिलेंडरपासून ते आरोग्य विम्यापर्यंत , जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २९ सप्टेंबर – मुंबई -कोरोना संकट काळाच्या पार्श्वभुमीवर येत्या १ ऑक्टोबरपासून तुमच्या आयुष्यात काही नवे बदल होणार आहेत. या नव्या महिन्यात सणांची सुरुवात होतेय. दरम्यान सरकारतर्फे अनलॉक ५ ची घोषणा होईल. हवाई मार्ग, मिठाई, गॅस सिलेंडर, आरोग्य विमा सहीत अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारेय. त्यामुळे याची माहिती असणं गरजेचं आहे.

गॅस सिलेंडर किंमत
तेल मार्केटींग कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या नव्या किमतींची घोषणा करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये यामध्ये काही चढ उतार पहायला मिळाले. १ ऑक्टोबरपासून एलपीजी किंमती वाढ किंवा घट होऊ शकते. याच्या मानसिक आणि आर्थिक परिणामासाठी तुम्ही तयार रहायला हवं.

मिठाईचे नियम
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एक आदेश जारी करून मिठाईच्या दुकानांना दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व मिठाईची मुदत संपण्याची तारीख किंवा ‘आधीची बेस्ट तारीख’ जाहीर करणे अनिवार्य केले आहे. ऑक्टोबर १ पासून आदेश अमलात आणला जाईल. आता, मिठाईच्या दुकानात सर्व मिठाईसमोर ‘तारखेपूर्वीचे सर्वोत्कृष्ट’ असं नमूद करणे आवश्यक असेल. दुकानदारांना आता मिठाईचा कालावधी पूर्ण होण्याच्या तारखेपूर्वी विकाव्या लागतील.

गाडी चालवताना..
गाडी चालवताना रुट नेविगेशनसाठी मोबाईलचा वापर होतो. पण हा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की गाडी चालवताना कोणता अडथळा येऊ नये. अन्यथा १ हजार ते ५ हजारपर्यंत दंड होऊ शकतो. रस्ते परिवहन मंडळाने यासंदर्भात माहिती दिली.

आरोग्य विमा
आरोग्य विम्या अंतर्गत तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. या पॉलिसींमध्ये १ ऑक्टोबरपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. यामुळे हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे नियम स्टॅंडराइज आणि ग्राहक केंद्रीत होणार आहेत. यात इतर काही बदल देखील आहेत.

परदेशात पैसे पाठवण महाग
केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवण्यावरील टॅक्स संदर्भात नियम जोडलाय. १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल. तुम्ही विदेशात शिकताय किंवा तुमच्या मुलाला पैसै पाठवताय किंवा विदेशातील तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करताय तर तुम्हाला ५ टक्के अधिक टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (TCT) भरावा लागणार आहे. रिझर्व बॅंकेच्या लिबरलाइज रेमिटेंस स्किम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींना टीसीएस द्यावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *