कोरोना विषाणूचे थैमान थांबले नसतानाच चीनच्या आणखी एक व्हायरसने देशाला धोका ; , ICMR ने दिला गंभीर इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० सप्टेंबर – चीनच्या वुहान लॅबमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचे थैमान थांबले नसतानाच आणखी एक चिंताजनक बातमी आली आहे. चीनमधून आलेला कॅट क्यू व्हायरस (सीक्युओ) देशात हाहाकार उडवून देऊ शकतो, असा गंभीर इशारा ‘आयसीएमआर’ने दिला आहे. या व्हायरसमुळे देशात अन्य काही आजारही पसरू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी, असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

आयसीएमआरने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या संशोधनात या आजाराचा उल्लेख केला आहे. हा आजार डास चावल्याने पसरतो आणि यामुळे मानवाला मेनेजाइटिस सारखा आजार जडू शकतो. लहान मुलांनाही याचा सर्वाधिक धोका असून यामुळे डोक्यात ताप जाऊन इजा होऊ शकते. हिंदुस्थानमध्ये आढळणारे डास हा आजार वेगाने पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. या व्हायरसचे प्राथमिक वाहक डुक्कर असल्याचेही आयसीएमआरने सांगितले.

कर्नाटकात आढळले दोन रुग्ण
पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट आफ वायरोलाजी (NIV) कडे तपासणीसाठी आलेल्या 883 सॅम्पलमधून दोन जणांना या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील वेगवेगळ्या भागातून हे सॅम्पल घेण्यात आले होते. तपासणीत कर्नाटकातील दोन सॅम्पल पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘झी न्यूज’ने याबाबत वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *