महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ ऑक्टोबर – नवीदिल्ली – सन 2018-19 मधील जीएसटी कराचा वार्षिक भरणा करणे. तसेच, या वर्षाच्या ऑडिट रिपोर्टसाठीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागलेली असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी यासाठी केंद्र सरकारला घ्यावी लागली.
सन 2018-19 मधील कराबाबतचा फॉर्म जीएसटीआर-9 तसेच 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील जीएसटीआर 9 सी फॉर्म भरण्यासाठीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि कस्टम विभागाकडून सांगण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मे महिन्यात वर्ष 2018-19 मधील जीएसटी कराचा भरणा करण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविली होती. त्याला आता आणखी एक महिना मुदतवाढ दिली आहे.