ऑक्टोबर महिन्यात तब्बल इतके दिवस बँका असतील बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ ऑक्टोबर – पुणे – ऑक्टोबर महिना उजाडताच सणासुदीच्या सीझनची नांदी झाली आहे. कोरोनामुळे बाजारपेठ आणि लोकांचे उत्पन्न सुस्त आहे. तरीही सुट्यांची पर्वणी असल्याने हा महिना घरच्यांसाठी वेळ देणारा आणि आनंदाचा जाणार आहे.सुट्या असल्या तरीही सण साजरे करताना सोशल डिस्टन्सिंग आणि काळजी घ्यावीच लागणार आहे. नाहीतर या आनंदावर विरजण पडण्याची भीती आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्याच दिवशी गांधी जयंती असते. या दिवसापासूनच सुट्यांना सुरुवात होणार आहे. या सणावारांवेळी सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. खासकरून बँका बंद राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे 14 दिवस बँका बंद असतील.

या महिन्यात गांधी जयंती, दूर्गा पूजा, मिलाद-ए-शरीफ, ईद-ए- मिलाद, लक्ष्मी पूजा, सरदार वल्लभभाई पटेल जयंती, महर्षि वाल्मीकि जयंती, कुमार पौर्णिमा आदी हॉलिडे असल्याने बँका बंद असतील. यामुळे बँकांची कामे लवकरात लवकर केलेली बरी.

बँका कधी बंद राहतील?
2 ऑक्टोबर- गांधी जयंती,
4 ऑक्टोबर – रविवार,
8 ऑक्टोबर- चेहल्लुममुळे स्थानिक सुटी,
10 ऑक्टोबर-दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असणार आहेत.
11 ऑक्टोबर – रविवार,
17 ऑक्टोबर- घटस्थापना स्थानिक सुटी,
18 ऑक्टोबर- रविवार,
23 ऑक्टोबर- दुर्गा पूजा असल्याने अगरतला, कोलकाता, शिलॉन्ग सह काही ठिकाणी बँका बंद राहतील.
24 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महानवमीमुळे बहुतेक ठिकाणी बँका बंद राहतील.
25 ऑक्टोबरला रविवार असल्याने साप्ताहिक सुटी.
26 ऑक्टोबरला विजयादशमी असल्याने तसेच गॅझेटेड सुटी असल्याने देशभरातील बँका बंद राहण्याची शक्यता आहे.
29 ऑक्टोबरला गुरुवार आहे, या दिवशी ईद असल्याने काही ठिकाणी सुटी आहे.
30 ऑक्टोबरला ईद ए मिलाद, कोजागिरी पौर्णिमा असल्याने गॅझेटेड सुटी आहे. य़ामुळे बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल जय़ंती अनेक राज्यांमध्ये बँका बंद असतील.

बँकांना स्थानिक सुट्या असल्याने इतर भागात बँका सुरु असणार आहेत. तसेच ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहणार आहेत.
आरबीआयने बँकांना सुटी काळात एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *