मुंबई लोकल ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होऊ शकते ; राजेश टोपे यांनी दिले संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ ऑक्टोबर – मुंबई : मुंबईतल्या लोकल ट्रेन्स या महिनाअखेर सर्वांसाठी सुरू होऊ शकतील, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याविषयी अंतिम निर्णय घेतील असंही ते म्हणाले. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश टोपे म्हणाले की, “मला अंदाज वाटतो की ऑक्टोबर संपेपर्यंत ट्रेन सुरू करण्यास काही हरकत नसावी. हा तसा केंद्राचा विषय आहे, पण राज्याचाही आहे आणि दोन्ही सरकारांनी मिळून ठरवायचं आहे.

पण लोकल सुरू झाल्या तरी, गर्दीवर कसं नियंत्रण ठेवणार? फिजिकल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळणार? हे प्रश्न कायम आहेत. तसंच लोकल ट्रेन सुरू झाल्यावर कोरोना विषाणूचा प्रसार वाढेल अशी चिंताही तज्ज्ञांना वाटतेय.लॉकडाऊन सुरू झाल्यावर 23 मार्चपासून मुंबईतली लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. जूनमध्ये काही प्रमाणात ट्रेन्स सुरू झाल्या, मात्र त्यातून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येतो आहे.

पण सर्वसामान्यांनाही लोकलनं प्रवास करू द्यावा अशी मागणी जोर धरतेय. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानेही सरकारने तशी परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. तसंच मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सरकार या महिन्यात लोकल सुरू करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *