बँकेत ठेवलेले आपलेच पैसे काढण्यावर अचानक मर्यादा येत असतील तर कस वाटेल ?..लवकरच होणार विधेयक मंजूर ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी- पी.के. महाजन – दि. ३ ऑक्टोबर – पुणे – बँकेत ठेवलेले आपलेच पैसे काढण्यावर अचानक मर्यादा येत असतील तर कस वाटेल ?.हो लवकरच तसे विधेयक मंजूर होणार आहे. ज्याचे नाव फायनान्सीयल रिझोलेशन अॅणड डिपाॅजीट इन्शुरन्स (FRDI)विधेयक 2017.समजा एखादी बँक डबघाईला यायला लागली असेल म्हणजे बँकेने दिलेली कर्ज वसुल होत नसतील , बँकेचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत असेल किंवा अजून कोणतेही कारण असू शकते जसे भ्रष्टाचार किंवा चोरी इत्यादी मुळे बँक तोट्यात गेल्यामुळे बँक बंद करायची वेळ बँकेवर येणार असेल, बँकेची दिवाळखोरी घोषीत करायची वेळ आली असेल अशावेळी बँक वाचविण्यासाठी बँकेतील सर्व खातेदाराचे जे पैसै शिल्लक असतील त्या पैशांचा वापर करून बँक दिवाळखोरीतून म्हणजे तोट्या तून वाचवायची असे अधिकार या FRDI विधेयकाद्वारे बँकांना देण्यात येणार आहेत असे समजते.

ज्या वेळी बँकेची दिवाळखोरी होईल त्या वेळी बँक आपल्याला फक्त 1 लाख तत्काळ काढण्याची हमी देईल उर्वरीत शिल्लक रक्कम बँक कधी देणार, किती किती देणार किंवा देणार की नाही हे सर्व अधिकार या FRDI विधेयकाद्वारे बँकेला मिळणार आहेत……….. थोडक्यात बँक डबघाईला गेली तर ती जनतेच्याच पैशातून वाचवायची. एकंदरीत बँक दिवाळखोरीत गेल्यावर सुरूवातीला सरकार जबाबदारी राहणार नाही. बँकेवर इतर कारवाई बँकिंग नियमानुसार व घटनेनुसार जी होईल ती होईल पण जनतेला आपल्या हक्काच्या पैशांवर पाणी सोडावे लागू शकते?……ऑगस्ट 2017 मध्ये तत्कालीन वित्तमंत्री माननीय अरूण जेटलींच्या उपस्थितीत संसद मध्ये हे विधेयक चर्चेला आणले होते.आता पुन्हा हे विधेयक येणारया अधिवेशनात संसद मध्ये आणून मंजूर करण्याची तयारी केंद्र सरकारची चालू आहे. या मागे जनतेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे असा दावा केंद्र सरकारकडूनं करण्यात येत आहे…….पि.के. महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *