केंद्र सरकारने मोराटोरीयम पीरियड चे चक्रवाढ व्याज माफ करण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करणार- सुनावणी होणार 5 ऑक्टोबर ‘2020 ला

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी- पि. के. महाजन – पुणे – दि. ४ ऑक्टोबर – भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने घेतला सकारात्मक निर्णय….मोराटोरीयम पीरियड चे चक्रवाढ व्याज माफ करण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र सादर करणार उच्च न्यायालयात—-सुनावणी होणार 5 ऑक्टोबर ‘2020 ला:—-लाॅकडावून च्या कालावधीतील उत्पन्ना स्तोत्र बंद असल्या मुळे कर्ज धारकांचे कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यात आले होते. ज्याला आपण मोराटोरीयम पीरियड म्हणतो.

सदर मोराटोरीयम पीरियड चे सहा महिन्याचे व्याजावरील व्याज माफ करण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे, तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करण्या चे ठरवले आहे असे समजते. येत्या 5 ऑक्टोबर ला त्या बाबतीत उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यांनी मोराटोरीयम पीरियड ची सवलत पुर्णपणे घेतली नाही म्हणजे ज्या कर्ज धारकांनी कर्जाचे काही हप्ते भरलेत व काही भरले नाहीत. त्यांनाही व्याजा वरील व्याज माफ केले जाणार आहे मात्र मोराटोरीयम पीरियड सूरू व्हायचे ज्यांचे 3 महिने हप्ते थकले होते म्हणजे जे आधीच एन.पी.ए.मध्ये होते त्यांना ही सवलत मिळणार नाही.

मात्र सरकार ने घेतलेल्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नक्की च उपयोग होईल कारण की व्याज सवलतीची जी रक्कम कर्ज धारकाला सुट मिळणार आहे तितके चलन बाजारात खरेदी साठी उपलब्ध होणार आहे,ज्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *