Horoscope Today दि. २६ सप्टेंबर २०२६ ; आज दिवस या राशींना लाभदायक. ………..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
हातातील कामाला यश लाभेल. शेजार्‍यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्‍याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवी च्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
इतरांचे प्रेम संपादन करा. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधि लाभू शकते.

डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *