मुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचे आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ ऑक्टोबर – उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

उल्लेखनीय आहे की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून शनिवारी अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी हाथरसमधील पीडित कुटुंबास भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.

गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावरून विरोधी पक्ष आंदोलन करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसमध्ये पोहोचल्या असून रविवारी समाजवादी पक्षाचे शिष्टमंडळ तेथे जाणार आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणावरुन विरोधी पक्ष कायदा व सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे राजीनामा मागत आहेत, तर बसपा सुप्रीमो मायावती यांनी, मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूरला जाऊन मठ चालवावे. अशी टीका केली आहे.

पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यूपी प्रशासनावर सत्य लपवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता योगी सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *