Horoscope Today दि. ०७ ऑक्टोबर ; आज क्रोधावर नियंत्रण ठेवा. ……..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑक्टोबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
उत्तम वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सामाजिक जाणीव कायम ठेवाल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. मित्रांशी वाद घालू नका. घराची सजावट कराल.

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्‍यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
अति श्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
चांगल्या कामासाठी प्रवास होतील. लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. पोटाची तक्रार लक्षात घ्या.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. परोपकाराची भावना जोपासाल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चिकाटी कायम ठेवा.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
अति तिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. घरातील कामे आवडीने कराल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची प्रगती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *