महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ ऑक्टोबर – पिंपरी चिंचवड – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या सहकार्याने व मदत नव्हे तर कर्तव्य ह्या भावनेतून , कासारवाडी आणि फुगेवाडी या भागातील 150 दिव्यांगना गहू, तांदूळ, पोहे, लाल तिखट, कांदा लसून मसाला,मास्क, सॅनिटायझर आणि डेटॉल साबण चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे पूर्णतः पालन करून सौ मीनाताई ठाकरे प्राथमिक शाळा फुगेवाडी येथे पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी अपंग सेल चे शहर उपाध्यक्ष श्री आनंद बनसोडे , श्री बाळासाहेब तरस, रवी भिसे ,नागेश काळे, गीता भिसे, दादासाहेब काशीद, मोहम्मदशफी पटेल,योगेश सोनार दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.