राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधींनी घेतली राज ठाकरेंची भेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ९ ऑक्टो. – मुंबई – राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज्यातील ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी ग्रंथालय पुन्हा सुरु करा, अशी मागणी करत राज ठाकरेंना निवेदन दिलं.

पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरु करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे ग्रंथालय प्रतिनिधींनी राज ठाकरेंना सांगितले.

राज्यात पुनश्च हरी ओम अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याच अनुषंगाने राज्यातील ग्रंथालये सुरु करण्यात यावी, ही मागणी घेऊन ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *