नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १३ ऑक्टो . – प्रतिनिधी – नांदेड – मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प आज 12 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा 100 टक्के भरल्याने त्यातून 9 हजार 432 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील 8 नदी घाटांवर 144 कलम लागू करण्यात आल्या आहेत. गोदावरी नदी पात्रात व नदी पात्रालगत 100 मिटरपर्यंत वाळूचे उत्खनन आणि वाहतूक प्रतिबंधीत करण्यात आली आहे. जनतेने नदीकाठांवर जावू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दि.12 ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्प 100 टक्के भरला तेथून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पातून 1816 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पुर्णा नदी पात्रात सुरू आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 14036 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येलदरी व सिध्देश्र्वर पाणलोट क्षेत्रातून 5824 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते त्यामुळे गोदावरीतील एकूण विसर्ग 31108 क्युसेक्स आहे. प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये परतीच्या पावसाने धुवून काढले तर पाण्याच्या विसर्गात वाढ सुध्दा होवू शकते. शहरामधून वाहणारी गोदावरी नदी तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणात जाते.ते धरण सुध्दा 100 टक्के भरले आहे. तेथून 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पण पोचमपाड धरण 100 टक्के भरले की, महाराष्ट्रात पाण्याचा फुगवटा तयार होतो.त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी होतो.पाणी थांबून राहते.
सध्या विष्णुपूरी प्रकल्पातील 6 दरवाजे उघडे असून त्यातून 94925 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.परतीच्या पावसाने धुतले तर हा विसर्ग सव्वा लाख क्युसेक्सपर्यंत वाढू शकतो.उर्ध्व पैनगंगा प्रकल्प सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 242 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा अत्यंत विक्राळरुप धारण करीत आहे. गोदावरी,पैनगंगा,पुर्णा,मनार आदी नदीकाठी राहणाऱ्या नागरीकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळचे अधिक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार यांनी केले आहे.वेळोवेळी नदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षातून दुरध्वनी क्रमांक 02462-263870 वरून मिळेल.

नांदेड जिल्ह्यातील वांगी, सिध्दनाथ,नागापूर,ब्राम्हणवाडा, बोंढार हवेली,नावघाट, गोवर्धनघाट, कौठा, असर्जन, बोरगाव,पिंपळगाव (को), राहाटी(बु),सोमेश्र्वर,जैतापूर, पिंपळगाव(निमजी),भनगी, गंगाबेट या गावातून होणाऱ्या अवैध रेती उत्खननाची दखल घेत या नदीघाटांवर कलम 144 लागू करण्यात आली आहे.या 100 मिटर परिसरात कोणी प्रवेश करू नये असे आदेश उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण यांनी जारी केले आहेत.नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरीकांनी दक्षता घेत आपल्या रक्षणाची जबाबदारी स्वत:वहन करावी आणि इतरांना सुध्दा मदत करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *