अजूनही आहे धोनीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १४ ऑक्टो . – प्रतिनिधी – शारजा – इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) 13व्या हंगामात 29वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सननरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांच्यात झाला. या सामन्यात CSKने हैदराबादला 20 धावांनी नमवले. या सामन्यात चेन्नईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये त्यांनी 167 धावांचे लक्ष हैदराबाद पुढे ठेवले.

चेन्नईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना SRHने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 147 धावा केल्या. यासह गुणतालिकेत CSK सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं 8 सामन्यातील 3 सामने जिंकले आहेत. CSKचा नेट रन रेट -0.390 आहे आणि 6 गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर परभवानंतरही हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

RCBची शानदार कामगिरी

गेल्या 12 वर्षात एकदाही बॅंगलोर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही आहे. त्यामुळे यंदा आरसीबी शानदार खेळी करत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. RCBचा संघ आता दिल्ली आणि मुंबईला टक्कर देत आहे. RCBनं 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 गमावले आहेत. 10 गुणांसह RCBचा नेट रन रेट -0.116 आहे.

टॉपवर आहे मुंबई आणि दिल्ली

आयपीएल 2020 पॉइंट टेबलवर आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे राज्य असल्याचे दिसत आहे. मुंबईनं 7 पैकी 5 सामने जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईचा नेट रन रेट 1.327 आहे. तर, दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनेही 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यांचा नेट रन रेट 1.038 आहे.

या संघाची अवस्था खराब

राजस्थान आणि हैदराबाद या दोन संघाना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर पंजाब संघ तळाशी आहेत. या संघाचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *