कोरोना अलर्ट : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येतोय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १४ ऑक्टो . – प्रतिनिधी – पुणे – पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे जिल्हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.या काळात पुणे शहरात दररोज सरासरी दीड ते दोन हजार रुग्ण वाढत होते. त्यातच बेड मिळण्यासाठी देखील अनेक रुग्णांना अडचणी निर्माण होत होत्या.एक महिन्यानंतर या परिस्थितीमध्ये आता हळूहळू सुधारणा होत असून पुणे शहरात दररोज सरासरी सातशे रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पिंपरी चिंचवड भागात आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना आटोक्यात येतोय का? असा प्रश्न आहे

साधारण गणेशोत्सवानंतर पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. या काळात बाजारापेठांमध्ये गर्दी झाल्याने तसेच नागरिकांनी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्याने कोरोनाचा प्रसार वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली होती.12 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह चाचणी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 28 टक्के इतके होते, तर याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रमाण 20 टक्क्यांवर आलं होतं. महिन्याभरानंतर 11 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 14 टक्क्यांपर्यंत खाली आले, तर पिंपरी चिंचवडमधलं प्रमाण 11 टक्क्यांपर्यंत खाली आलं होतं.

‘…तर येऊ शकते दुसरी लाट’
संसर्ग आटोक्यात आला असला, ”आता दसरा तसेच दिवाळी हे सण आहेत. या काळात नागरिकांनी पुन्हा दुकानांमध्ये, बाजारपेठांमध्ये गर्दी केली, सोशल डिस्टंन्सिंग पाळलं नाही, मास्कचा वापर केला नाही तर दिवाळीनंतर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.
“जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे थंडीच्या काळात रुग्णसंख्या ही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जरी आकडे कमी होत असले तरी साथ नियंत्रणात आली आहे असे म्हणता येणार नाही. त्यासाठी पुढील काही आठवडे रुग्णसंख्या सातत्याने कमी होण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. कोरोनाच्या रुग्णाला लवकर उपचार मिळाल्यास तो लवकर बरा होतो,”

पुण्याची आकडेवारी काय सांगते?
पुण्याची आकडेवारी पाहिली तर 12 सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1909 इतके नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या दिवशी 6626 इतक्या चाचण्या करण्यात आल्या, तर 41 नागरिकांचा मृत्यू झाला होता. पिंपरी चिंचवडमध्ये याच दिवशी 1363 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, तर 6554 इतक्या चाचण्या झाल्या होत्या. या दिवशी 16 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

एका महिन्यानंतर या आकड्यांमध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येत आहे. 11 ऑक्टोबर रोजी पुण्यात 697 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर या दिवशी 4788 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. या दिवशी 23 नागरिकांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये 490 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 4097 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. 7 नागरिकांचा या दिवशी मृत्यू झाला.

11 ऑक्टोबरच्या पुणे जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या 154230 इतकी झाली आहे, तर 12898 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 3978 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवसाची पिंपरी चिंचवडची एकूण रुग्णसंख्या

83785 इतकी झाली असून 4204 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आत्तापर्यंत 1432 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *