आयफोन 12 Mini लाँच, जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १४ ऑक्टो . – प्रतिनिधी – पुणे – मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी अमेरिकेतील आघाडीची कंपनी अॅपलने आयफोन 12 सिरीजचं अनावरण केलं आहे. यामध्ये त्यांनी चार नवे मॉडेल बाजारात आणले आहेत.मंगळवारी एका ऑनलाईन कार्यक्रमात अपलने या नव्या मॉडेल्सची घोषणा केली.आयफोन 12 सिरीजच्या मोबाईल फोनमध्ये 5जी नेटवर्क चालू शकेल, असंही कंपनीने म्हटलं आहे.”आम्ही आयफोनमध्ये 5जी नेटवर्क सुरू करत आहोत. आयफोनकरिता ही नव्या युगाची सुरुवात असेल,” असं यावेळी अॅपलचे प्रमुख टिम कुक म्हणाले.

आयफोन आता तुमच्या आमच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत स्टीव्ह जॉब्स यांचा नोकरीसाठीचा पहिला अर्ज तुम्ही पाहिला आहे?तुमचा आयफोन स्लो झालाय का? अॅपल ‘सॉरी’ म्हटतंय! अॅपलने आयफोन 12 (64, 128 आणि 256 GB स्टोरेज), आयफोन 12 मिनी (64, 128 आणि 256 GB स्टोरेज) यांच्याशिवाय आयफोन 12 प्रो (128, 256 आणि 512 GB स्टोरेज), आयफोन 12 प्रो मॅक्स (64, 128, 256 GB स्टोरेज) हे मोबाईल लाँच केले आहेत.

काय असेल किंमत?
आयफोन 12 सिरीजमधील मोबाईल्सची किंमत 70 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत आहे.स्टोरेजच्या हिशोबाने याच्या किंमतीत वाढ होत जाते. 64 GB स्टोरेजच्या आयफोन 12 मिनी मोबाईलची किंमत भारतात 69 हजार 900 रुपये इतकी आहे. यातील 256 GB चं मॉडेल 84 हजार 900 रुपयांना मिळणार आहे.

त्याच प्रमाणे 512 GB स्टोरेजच्या आयफोन प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये आहे.
आयफोन 12 मिनी 5जी तंत्रज्ञान वापरण्यात आलेला जगातील सर्वांत लहान फोन आहे.

कधी उपलब्ध होणार?
जगभरात आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रोचं बुकींग 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल तर हा मोबाईल 23 ऑक्टोबरपासून वितरीत केला जाईल.
आयफोन 12 मिनीसाठी बुकींग 6 नोव्हेंबरपासून सुरू होईल. 13 नोव्हेंबरनंतर हा मोबाईल मिळायला सुरुवात होईल.
त्याचप्रमाणे, आयफोन 12 प्रो मॅक्स 6 नोव्हेंबरपासून ऑर्डर करता येईल. 20 नोव्हेंबरपासून हा मोबाईल आपल्या हाती येईल.
भारतात हा मोबाईल कधीपर्यंत मिळेल, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *