तुमची ओळख सांगते हस्ताक्षर

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो – . हस्तलेखनावर पहिले पुस्तक इटलीच्या मॅक्ली बाल्डी यांनी १९३२ मध्ये लिहिले गेले. अशाप्रकारच्या पुस्तकांच्या अध्ययनातून मानसशास्त्रीय, पोलिस, व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना अन्य व्यक्तींबाबत माहिती मिळवण्यात मदत मिळते. हस्तलेखनाचे महत्व स्पष्ट आहे. प्रत्येक व्यक्तींच्या हस्तलिपीमध्ये अक्षरांची गोलाई, लिहिताना दिला जाणारा दाब, लिहिण्याची गती आदिमध्ये भिन्नता आढळते हस्तलेखनाला मेंदूचे लेखन असे म्हटले जाते. कारण अनुभवी हस्तलेख तज्ज्ञांसाठी हे कोणत्याही लेखकाची अवचेतन अनुभूतीची अभिव्यक्ती असते. प्रत्येक व्यक्तीच्या हस्तलिपीत एक वैशिष्ट्य असते आणि एकच व्यक्तीच्या हस्तलिपीत दुर्बलता, घाईगडबड, उत्तेजना अथवा आजारामुळे परिवर्तन येऊ शकते. मात्र लक्षणीय बाब म्हणजे या कारणांबरोबरच संबंधिताचे व्यक्तीमत्व ओळखले जाऊ शकते.
.

काही व्यक्ती गोल, मोठे स्पष्ट आणि काही व्यक्ती छोटे, गुंतागुंतीचे, अस्पष्ट अक्षर लिहितात. लिखावटीत जोर देऊन किंवा हलक्या हाताने लिहितात. या पद्धतींचे सूक्ष्म विश्लेषण करून व्यक्तींच्या स्वभाव, मानसिकता आदीबाबात माहिती मिळवता येते.
एखादी व्यक्ती सरळ लिहिते याचा अर्थ, त्याच्या मेंदूचा प्रभाव हृदयावर असतो आणि अशा व्यक्ती स्वतंत्र, थंड आणि आत्मविश्वासू असतात. सहजपणे वाहवत नाहीत. त्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या नसतात. मात्र व्यवास्थित आणि नियमितपणे कार्य करण्याची त्यांची सवय असते.

सरळ हस्तलिपी असणार्यांीत भाव संप्रेषणीयतेचा अभाव असतो. ते आत्मकेंद्री, उच्च योग्यतेने सुशोभित महत्वाकांक्षी व्यक्ती असतात.
आपल्या योग्यतेचा पूर्णपणे उपयोग करण्यात निपुण असतात. बहुतांश अशाप्रकारचे हस्तलेखन नेते, मॅनेजर आणि करियरला प्राधान्य देणार्याे महिलांमध्ये आढळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *