काश्मिरींच्या हक्कांसाठी अब्दुल्ला, मुफ्ती यांच्याकडून सहा पक्षांच्या महाआघाडीची स्थापना

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो -जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात तेथील सहा पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीची स्थापना केली आहे.राजकारणात आतापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुफ्ती आणि अब्दुल्ला हे कलम 370 हटवण्याच्या विरोधात एकत्र आले असून त्यांनी सहा पक्षांच्या संयुक्त आघाडीची स्थापना केली आहे.’पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन’ असं नाव या महाआघाडीला देण्यात आलं आहे. या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी, सीपीआय-एम, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट, पीपल्स कॉन्फरन्स आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचा समावेश आहे.

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नुकतीच नजरकैदेतून सुटका झाली. त्यानंतर गुरुवारी या सर्व पक्षांची बैठक झाली. 5 ऑगस्ट 2019 पूर्वी कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. हा निर्णय मागे घेऊन काश्मीर खोऱ्यात पूर्वीचीच स्थिती निर्माण करावी, अशी मागणी पीपल्स अलायन्सने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *