निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुककडून 22 लाख आक्षेपार्ह जाहिरातींना डच्चू

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – वॉशिंग्टन – दि. १९ ऑक्टो – :अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने खबरदारी घेतली आहे. निवडणूक काळात चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील 22 लाख जाहिराती फेसबुकने डिलीट केल्या आहेत. तसेच 1, 20 हजार पोस्ट काढून टाकल्या आहेत.

फेसबुकचे व्हॉईस प्रेसिंडेट निक क्लेग म्हणाले, अमेरिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना संभ्रमित करणाऱ्या अनेक जाहिराती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर झळकत होत्या. 2016 मध्ये निवडणूक काळात असाच प्रकार झाला होता. तेव्हा फेसबूकवर मतदारांना प्रभावित केल्याचे आरोप लावण्यात आले होते. 2016 मध्ये ब्रिटनमध्येही याच प्रकारची समस्या उद्भवली होती. त्यामुळे यंदा खबरदारी बाळगत फेसबुकने अशा जाहिराती डिलीट केल्या आहेत.

चुकीची माहिती प्रसारित करण्यावरुन 150 दशलक्ष पोस्टना सुचना देखील पाठवली गेली आहे. 35 हजार कर्मचारी आमच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षा ठेवण्यासाठी कार्यरत आहेत, असे निक क्लेग यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *