दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडतील

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – पुणे – दि. २०ऑक्टो – : देशातील विविध भागामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांची पीक जमीनदोस्त झालीयत. कांद्यावर देखील याचा परिणाम दिसून आलाय. कांद्याच्या किंमती देखील दिवसेंदिवस वाढत असून असंच सुरु राहीलं तर दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडतील असं म्हटल जातयं.

देशातील सर्वात मोठी कांद्याची मंडई असलेल्या महाराष्ट्रातील लासलगावमध्ये कांदा ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस पडतोय. यामुळे शेतातील कांदा खराब झालाय.

कर्नाटकमध्ये पावसामुळे कांद्यावर परिणाम झालाय. अवेळी आलेल्या पावसामुळे कांद्याची पूर्तता कमी होऊ लागली. याचा परिणाम किंमतींवर झालाय. सोमवारी लासलगावला मंडई उघडली तेव्हा कांद्याचे भाव २ हजार प्रति क्विंटलपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले.

मोठ्या व्यापाऱ्यांची कोंडी
लासलगावमध्ये सोमवारी कांद्याचा कमाल भाव ६,८०२ प्रति क्विंटल, सरासरी भाव ६२०० रुपये आणि खराब कांद्याचा भाव १५०० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. १४ ऑक्टोबरपर्यंत लासलगावच्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची धाड पडली. या भीतीमुळे व्यापारी मंडईत येत नव्हते. पण सोमवारी व्यापारी मंडईत पोहोचले आणि कांद्याचे दर वाढल्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *