सावधान! ‘हेल्मेट’ नसेल घातले तर Driving License होऊ शकते निलंबित

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि . २२ ऑक्टो – देशात 1 ऑक्टोबरपासून नवीन वाहतूक कायदा लागू झाला आहे. ज्यामध्ये वाहन संबधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता वाहन चावताना तुम्हाला वाहनाशी संबंधित कागदपत्रे सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. ही कागदपत्रे तुम्ही E-Documents स्वरूपात सरकारी पोर्टलवर ठेवू शकता.

वाहनांच्या कागदपत्रांच्या नियमांमध्ये दिलासा मिळाला असला तरी आता हेल्मेट न घातल्यास तुमचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. सोबतच तुमच्याकडून दंडही आकाराला जाऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटक सरकारने हेल्मेटचे नियम पाळले जावेत म्हणून काही कठोर पावले उचलली आहेत. 4 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने हेल्मेट घालणे आवश्यक आहे, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

कर्नाटक राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना आढळली, तर त्याचा वाहन चालवण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. तसेच 1000 रुपये दंड भरावा लागेल. या नवीन नियमाचे लोक पालन करून स्वत: चे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करतील, अशी सरकारने अशा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *