कशी आहे अजित पवार यांची तब्येत ; वाचा बातमी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २३ ऑक्टो – राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द केला होता. मात्र यावेळी कोणतंही कारण दिले नाही. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत . याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अजित पवार तीन दिवसांपुर्वी अतिवृष्टीच्या पाहणीसाठी सोलापुर दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागल्याने तातडीने कोरोना चाचणी केली .

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितंल होतं. राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सकाळी उपलब्ध राहू शकणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती. अजित पवारांनी हे ट्विट रिट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी”.

इंडियन एक्स्प्रेस नुसार – Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar has tested positive for Covid-19, highly placed sources told The Indian Express. He has mild symptoms and has been quarantined at his home in Mumbai.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *