कोकण ला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २३ ऑक्टो – कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चाचपणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख दिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित देशमुख यांनी हे निर्देश दिले.

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *